जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, तेव्हा ती जागा निवडताना आपण अनेक बाजूंचा विचार करतो. ती जागा छान असायला हवी, जिथे चांगल्या प्रकारे सुट्टी घालवता येईल अशी आपली इच्छा असते. पण आपल्यासोबत एक अशी गोष्ट असते जी आपल्याला सुट्टीचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ देत नाही. ती गोष्ट म्हणजे आपला स्मार्टफोन! कारण आपण जाऊ तिथले चांगले फोटो आपल्याला सोशल मीडियावर टाकायचे असतात. आणि या नादात त्या जागेला पूर्ण एन्जॉय करायचे राहून जाते. सुट्टी मनसोक्त एन्जॉय न करता बराच वेळा, लाईक कमेंट चेक करण्यातच जातो.
त्यात ऑफिसचे इमेल्स, ऍप्सही मोबाईलवरच असतात. त्यामुळं सध्याच्या काळात माणसाच्या तणावाचे सर्वात मोठे कारण मोबाईल आहे राव!! आणि जिथे आपण तणाव घालविण्यासाठी जातो, तिथेसुद्धा तणावाचे कारण सोबत वागवत असू तर कसे चालेल?








