सध्या इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती मिळत आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या गाड्यांमुळे पसरणाऱ्या प्रदूषणावर इलेक्ट्रिक वाहन हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहे. असं असलं तरी इलेक्ट्रिक गाड्या तूर्तास तरी सगळ्यांच्याच आवाक्यात नाहीत. या गाड्या महाग असतात. शिवाय भारतात चार्जिंग स्टेशन्सची कमतरता आहे. पण काळजी करू नका. तुम्ही जर बांद्रा कुर्ला भागात राहत असाल किंवा प्रवास करत असाल तर तुम्हाला अवघ्या १० रुपयात इलेक्ट्रिक बाईक मिळू शकते. ती कशी मिळवायची, त्यासाठी पैसे किती लागतील? सगळी माहिती आजच्या लेखात जाणून घेऊ.
फक्त १० रुपयांत चालवा मुंबईत बाईक!! कसे, कुठे, केव्हापासून?? वाचा मग संपूर्ण माहिती !!


मुंबईतल्या ई-बाईकची कल्पना काय आहे?
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (MMRDA) आणि युलू बाईक्स (Yulu bikes) कंपनीने एकत्र येऊन ही कल्पना मांडली आहे. ई-बाईक म्हणजे सोप्या भाषेत बाईक भाड्याने घेणे, पण इथे पैशांचा व्यवहार ऑनलाईन असतो.
MMRDA च्या आगामी प्रकल्पानुसार बांद्रा आणि कुर्ला स्टेशन परिसरात २५ ते ३० ई-बाईक्स ठेवण्यात येणार आहेत. या बाईक्स लॉक असतील. त्या अनलॉक करण्यासाठी युलू अॅप डाऊनलोड करावा लागेल. या अॅपवर आजूबाजूच्या परिसरात ई-बाईक स्टेशन्स कुठे आहेत हे दाखवणारा नकाशा उपलब्ध असेल.

बाईक अनलॉक करण्यासाठी तुम्हाला १० रुपये फी द्यावी लागेल. पैसे चुकते केले की बाईकवरचा QR कोड स्कॅन करायचा. बाईक अनलॉक होईल. पुढच्या प्रत्येक १० मिनिटांसाठी १० रुपये या हिशोबाने बाईक वापरण्याचं भाडं द्यावं लागेल. बाईक वापरून झाल्यावर ती पुन्हा जवळच्या स्टेशनवर लॉक केली की काम संपलं.
या ई-बाईक्स पुढच्या १० दिवसात उपलब्ध होतील. सुरुवात २५ ते ३० बाईक्स पासून होणार असली तरी ही असंख्य ५०० बाईक पर्यंत वाढवण्यात येणार आहे. संपूर्ण बीकेसी भागात २५ झोन्स असणार आहेत. या ई-बाईकचा एक फायदा म्हणजे तुमच्याकडे लायसन्स असण्याची गरज नाही.

सध्या नवी मुंबई भागात युलू बाईक्स उपलब्ध आहेत. हा प्रयोग जर बीकेसीमध्ये यशस्वी झाला तर ट्राफिक आणि प्रदूषणाला चांगलाच आळा बसेल.
मग तुम्ही वापारणार ना ई-बाईक?
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१