मुलुंडकरांना मायकल मिसळपाव स्टॉलबद्दल नक्कीच माहित असणार. जे मिसळपावचे कट्टर चाहते आहेत त्यांनाही या स्टॉलबद्दल माहित असणार, पण मायकल मिसळपावच्या मागची गोष्ट माहित आहे का ? नक्कीच माहित नसणार. म्हणून आम्ही ही गोष्ट घेऊन आलो आहोत.
पहाटे ४ वाजता विकल्या जाणाऱ्या मुलुंडच्या प्रसिद्ध मायकल मिसळपावच्या जन्माची गोष्ट !!


मायकल मिसळपावचे मालक एलार तेल्लीस हे कर्नाटकच्या मंगळूर येथून ४६ वर्षांपूर्वी मुंबईत आले. मुंबईत नशीब आजमावायला आलेल्या अनेकांमध्ये ते एक होते. त्यांना मुंबईत स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. मुंबईत आल्यावर त्यांनी चहाच्या टपरीवर काम केलं. ते अंधेरी स्टेशनवर काम करायचे. त्यानंतर त्यांनी वांद्र्यात चहा टपरीवर काम केलं. मुंबईत चहा व्यवसाय कसा चालतो हे शिकून घेतल्यानंतर त्यांनी स्वतःची चहा टपरी सुरु केली.
स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यानंतर एलार उर्फ मायकल यांनी आपल्या दोघा भावांना मदतीसाठी मंगळूरहून बोलावून घेतलं.थोड्या दिवसांनी कर्ज घेऊन मायकल यांनी भावाला रिक्षा घेऊन दिली. भाऊ रात्री रिक्षा चालवायचा, तर ते स्वतः ४ वाजता चहा विकून दिवसा रिक्षा चालवायचे.

मायकल ज्या ठिकाणी चहा विकत होते त्या सर्वोदय नगरमध्ये एक खाद्यपदार्थाचा स्टॉल होत्या. तो अचानक एके दिवशी बंद झाला. मायकल यांनी या संधीचा फायदा घेऊन तिथे स्वतःचा स्टॉल सुरु केला. आणि इथूनच मायकल मिसळपावची सुरुवात झाली.
कोणतंही खाद्यपदार्थाचं दुकान हे दिवसभर चालू राहतं, पण मायकल मिसळपाव फक्त सकाळी ४ ते ७ दरम्यान सुरु असतं. मुंबई कधीही झोपत नाही म्हणतात. अशा न झोपणाऱ्या मुंबईला पहाटे मिसळपाव खाऊ घालण्याचं काम मायकल मिसळपाव करतं.
सुरुवातीच्या दिवसात मायकल मिसळपाव चालत नव्हतं. मोठ्याप्रमाणात नुकसान झालं. पुढे गणपती विसर्जनाच्यावेळी सगळा नूर बद्दलला. विसर्जनाला आलेली मंडळी मिसळपाववर तुटून पडली. त्या दिवसानंतर मायकल मिसळपाव आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध झालं. आजही पहाटे ४ ते ७ वाजेपर्यंत हा स्टॉल गजबजलेला असतो.
तर मंडळी, ही होती मायकल मिसळपावची गोष्ट. मुलुंडला असाल तर मायकल मिसळपावला नक्की भेट द्या. भेट दिल्यावर एक सेल्फी काढून आम्हाला पाठवायला विसरू नका.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१