मुंबई कधीही बंद पडत नाही म्हणतात, पण कोरोनाने मुंबई बंद पाडली. कोरोना सोडला तर आणखी एका गोष्टीने मुंबईला थांबायला भाग पाडलं होतं. १२ ऑक्टोबर २०२० मध्ये संपूर्ण मुंबईची वीज खंडित झाली होती. ऐन कोरोनाच्या संकटात विजेमुळे मुंबईची यंत्रणाच विस्कळीत झाली होती. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला. असं म्हणतात की ग्रीड फेल्युअरमुळे किंवा मानवी चुकीमुळे हा बिघाड झाला होता. पण हे कारण बरोबर आहे का?
आज ६ महिन्यांनी हा प्रश्न पडण्यामागचं कारण म्हणजे अमेरिकेच्या सायबरसुरक्षा कंपनीच्या दाव्यानुसार मुंबईची वीज घालवण्यामागे चीनचा हात होता. हे काय नवीन प्रकरण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.







