काही दिवसांपूर्वी तुम्ही एका बुलेट हॉटेलबद्दल वाचले होते, ज्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बुलेट थाळीचा अनोखा उपक्रम राबवला होता. तो खूप चाललाही होता. मोठमोठे हॉटेल्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्या अनेक योजना राबवत असतातच. पण एका रस्त्यावरच्या डोसा विक्रेत्याने आपल्या वेगळ्या शैलीनी सगळ्यांनाच आकर्षित केले आहे. त्याचा व्हिडीओ सोशलमिडीयावर नुसता धुमाकूळ घालतोय.
एकदा तो व्हिडीओ बघून घ्याच.
मुंबईच्या स्ट्रीट फूडचे देशभरात सगळ्यात जास्त आकर्षण आहे. कुठलाही पदार्थ तिथे मिळत नाही असं होतच नाही आणि तेही अगदी रास्त किमतीत. रोज कितीतरी लोक आपलं पोट इथे भरत असतात. जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी लांबून लांबून ग्राहक येतात. साऊथ मुंबईच्या मंगलदास मार्केटमध्येही असे अनेक विक्रते आपली गाडी घेऊन उभे राहतात. तिथलाच श्री बालाजी डोसावाला त्याच्या डोसा उडवण्याच्या एका अनोख्या शैलीने एकदम प्रसिद्ध झालाय.





