मुंबई स्वप्नांची नगरी म्हटली जाते. पण या स्वप्नांच्या नगरीत राहणाऱ्या लोकांचे स्पिरिट पण तेवढेच प्रसिद्ध आहे. मुंबईत लोकल असो की इतर कुठली जागा एकमेकांना सांभाळून घेतले जाते. मुंबई स्पिरिटचा याची देही याची डोळा अनुभव देणारी घटना आज घडली आहे.
मुंबईतील वाळकेश्वर भागात एक चारचाकी गाडी उलटली होती. ही गाडी परत जशीच्या तशी उभी करण्यासाठी एकेक करत लोकांचा जमाव तयार झाला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये गाडी पूर्ववत करण्यात आली. 'लोग आते गये और कारवाँ बनता गया' या म्हणीप्रमाणे एकेकजण येऊन गाडीला हलवण्यासाठी हातभार लावू लागला.




