व्हिडीओ ऑफ दि डे : चक्क अमेरिकेतले पोलीस खेळतायत गरबा...व्हिडीओ पाहून घ्या !!

व्हिडीओ ऑफ दि डे : चक्क अमेरिकेतले पोलीस खेळतायत गरबा...व्हिडीओ पाहून घ्या !!

मंडळी भारतीय सणवार आता ग्लोबल झाले आहेत. युरोपात, अमेरिकेत गणेशोत्सव, होळी सारखे सण उत्साहात साजरे होतात. नुकताच होऊन गेलेला नवरात्रोत्सव अमेरिकेतही साजरा झाला. घटस्थापनेपासून ते गरबा आणि दांडिया पर्यंत जंगी कार्यक्रम होता. न्युयॉर्क मध्ये साजरा झालेल्या अशाच एका नवरात्रोत्सवामधला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये न्युयॉर्कचे पोलीस चक्क गरबा खेळताना दिसतायत राव.

गीतिका स्वामी यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात २ पोलीस गरबा खेळताना दिसतायत तर भारतीय त्यांना शिकवत आहेत. दोघेही पोलीस अधिकारी गुजराती गाण्याच्या ठेक्यावर रंगून गेलेले दिसत आहेत. न्युयॉर्क पोलिसांना वर्दीत गरबा खेळताना बघून गंमत वाटत आहे.

व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर ८०० पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ रिट्विट केला आहे तर २३००० पेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. रिट्विट करणाऱ्या ८०० लोकांमध्ये आपला हरभजनसिंग पण होता राव.

चला तर आता तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ बघून घ्या !!

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख