नौफ अल मारवाई या सौदी अरेबियन महिला आहेत. सौदी अरेबियन असून देखील त्यांना भारताने २०१८ साली देशातील सर्वात मोठा सन्मानापैकी एक असलेला पद्मश्री पुरस्कार दिला. एका परदेशी महिलेला हा सन्मान देण्यामागे कारण देखील तसेच आहे. सौदी अरेबिया सारख्या महिलांवर अनेक निर्बंध असलेल्या देशात राहूनही नौफ यांनी मोठ्या प्रमाणावर योगचे प्रशिक्षण देण्यास देण्याचे काम केले आहे.
अरेबियन असूनही या अभारतीय बाईंना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे? असं नक्की काय काम त्यांनी केलं आहे?


नौफ या कधीकाळी स्वतः प्रचंड आजारी होत्या. त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता. योगच्या माध्यमातून त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली. योगबद्दल असलेल्या प्रेमामुळे त्यांनी योगचा स्वतःच्या देशात प्रचार प्रसार करण्याचे ठरवले. त्या स्वतः १९९८ सालापासून योग करतात. त्यांनी २००९ साली योगवर आधारित उपचार देण्यासाठी चिकित्सा केंद्र स्थापन केले होते. २०१० साली सौदी येथे त्या आंतरराष्ट्रीय योग संघाच्या मानद सचिव बनल्या. भारताने देखील त्यांना २०१२ साली योगलिंपिक समितीचे उपाध्यक्ष केले होते.

नौफ यांनी आजवर तीन हजार पेक्षा जास्त मुलांना योगचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच आजवर त्यांनी ७० पेक्षा अधिक लोकांना योगशिक्षक बनवले आहे. त्यांच्या या कामासाठी त्यांना केरळ सरकारने योगचारीनी अशी उपाधी देखील दिली आहे.

नौफ यांनी सौदीत योगला मान्यता मिळावी म्हणून सौदीच्या राजांजवळ सातत्याने पाठपुरावा केला होता. भारताने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव ज्यावेळी संयुक्त राष्ट्रासमोर ठेवला होता, तेव्हा त्याला समर्थन न देणाऱ्या देशांमध्ये सौदी एक होता. पण तरी देखील नौफ यांनी सौदीत योगला मान्यता मिळवून दिली. नौफ यांच्या याच कामाची दखल घेत भारत सरकारने देखील त्याना पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला आहे.
तर, नौफ यांनी विरोध असूनही सतत पाठपुरावा करून योगला सौदीत स्थान मिळवून दिले आणि त्यांचं कार्य आज जगासमोर आहे. ही गोष्ट विशेष कौतुकास्पद वाटते. यासाठी बोभाटाचा सलाम सलाम.
तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा !!
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१