खराखुरा हिरो- ओएनजीसी आगीत या मॅनेजरने स्वतःची आहुती देऊन वाचवले कित्येकांचे प्राण!!

लिस्टिकल
खराखुरा हिरो- ओएनजीसी आगीत या मॅनेजरने स्वतःची आहुती देऊन वाचवले कित्येकांचे प्राण!!

सगळेच हिरो सुपरमॅन किंवा स्पायडरमॅन सारखे नसतात. काही सुपरहिरो हे आपल्यातलेच सर्वसामान्य चेहऱ्याची माणसं असतात. नुकतंच अशाच एका हिरोने आपल्या जीवाची बाजी लावून लोकांचा जीव वाचवला आहे.

मंडळी, ही घटना आहे नवी मुंबईतील ओ.एन.जी.सी प्लांटला लागलेल्या आगीत प्लांटचे जनरल मॅनेजर सी एन राव हे होरपळून मृत्युमुखी पडले. त्यांनी मरण्यापूर्वी जे काम केलं त्याने अनेकांना जीवनदान मिळालंय.

त्याचं झालं असं, की प्लांटमध्ये वायू गळती होत होती. ही गळती नेमकी कुठून होत आहे हे तपासण्यासाठी सी एन राव स्वतः पुढे सरसावले. त्यांनी गॅस पाईपलाईन शोधून काढली आणि तिथला व्हॉल्व बंद केला. यानंतर ते इतर पाईपलाइन्सच्या पाहणीसाठी वळले, पण तितक्यात मोठा स्फोट झाला.

मंडळी, सी एन राव यांनी जर वेळीच तो व्हॉल्व बंद केला नसता तर कित्येकांना जीव गमवावा लागला असता. इतरांच्या जीवासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली.

सी एन राव यांना १९९० साली ‘ओ.एन.जी.सी’त नोकरी मिळाली. दोन वर्षापूर्वी त्यांची बदली नवी मुंबईतील उरण प्लांटमध्ये झाली होती. त्यांचे सहकारी म्हणतात की ते नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असायचे.

सी एन राव यांना हिरोला बोभाटाचा सलाम.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख