कालप्रवाह सदैव वाहातच असतो. ज्याची नोंद होते, त्याला इतिहास म्हणतात. पण तो नोंदवणे आणि पुन्हा पुन्हा सांगणे गरजेचे असते. नाहीतर त्याचे विस्मरण होते. अशीच एक फारशी माहीत नसलेली गोष्ट सांगायला हवी.
ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेल्या भारताची फाळणी करायचे ठरले आणि दोन राष्ट्रे - एक हिंदुस्तान आणि दुसरे पाकिस्तान- जन्माला यायचे नक्की झाले. त्याची धामधूम सुरू झाली. आता हाकेच्या अंतरावर पाकिस्तानचा जन्म होणार, तेवढ्यात कुणाच्यातरी लक्षात आलं की पाकिस्तानचे राष्ट्रगीतच तयार झालेलं नाही. एकच धावपळ झाली.










