परमवीर चक्राचे पराक्रमी या लेखमालेच्या आजच्या भागात १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात देशासाठी बलिदान देणारे लेफ्टनंट कर्नल अर्देशिर तारापोर यांच्या शौर्याची कथा सांगणार आहोत.
तारापोर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांनी आपल्या सैन्य जीवनाची सुरुवात १९४२ साली हैदराबाद सेने ७ व्या इंफंट्रीपासून केली होती. १९६५ साली भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी तारापोर यांची पदोन्नती लेफ्टनंट कर्नल म्हणून झाली होती. पाकिस्तान या युद्धात मोठ्या तयारीने उतरला होता. शत्रूने २ लाख ६० हजारची इंफंट्री, २८० विमाने आणि ७५६ रणगाडे युद्धात उतरविले होते. इकडे भारत देखील पूर्ण तयारीत होता. तारापोर यांना या युद्धात भारतीय सैन्याचे कमांडिंग ऑफिसर म्हणून पाठवण्यात आले होते.






