आयच्या गावात !! आधार कार्डचा हेल्पलाईन नंबर तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये कसा काय आला ??

आयच्या गावात !! आधार कार्डचा हेल्पलाईन नंबर तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये कसा काय आला ??

राव, आधारकार्डची माहिती सुरक्षित आहे या समजुतीला सुरुंग लागलाय. गेल्याच आठवड्यात ‘ट्राय’च्या (TRAI) प्रमुखांनी आधारकार्डचा नंबर देऊन डेटा लीक करण्याचं चॅलेंज दिलं होतं आणि ते तोंडावर आपटले होते. ती काय भानगड होती हे  आमच्या या लेखात सविस्तर दिलेलं आहेच.

स्रोत

तर,  या बातमीनंतर आता नवीन बातमी येऊन धडकलीय. बातमी सांगण्याआधी आपण एक छोटासा प्रयोग करून बघूया. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये UIDAI (आधारकार्ड) चा हेल्पलाईन नंबर आहे का तपासून पाहा. आता तुम्ही म्हणाल की, आम्ही हा नंबर सेव्ह केलेला नाही मग नंबर कसा मिळेल ? त्याचं काय आहे ना, हा नंबर बऱ्याच फोन्समध्ये आपोआप सेव्ह झालेला आहे. पण कसा ?

राव, एका ट्विटर युझरने याबद्दल विचारलं होतं. त्याच्या फोन मध्ये UIDAI चा हेल्पलाईन नंबर सेव्ह होता. पण त्याने हा नंबर स्वतःहून सेव्ह केला नव्हता. त्याने याबद्दल ट्विटरवर प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर मिळालं की आधारकार्डचं अॅप डाऊनलोड केल्यावर हा नंबर आपोआप सेव्ह होतो.

चला, म्हणजे हा नंबर सेव्ह कसा होतो याचं उत्तर तरी मिळालं. पण नंतर लक्षात आलं की अनेकजण असेही आहेत ज्यांनी हा अॅप डाऊनलोड केलेलंच नाही, तरीही त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये हा नंबर आहे. हा प्रकार ट्विटरवर पसरत गेला आणि अनेकांनी आपले फोन तपासले. अनेकांच्या फोनमध्ये हा नंबर आढळून आल्यावर लोक चक्रावले ना भाऊ.

एका ट्विटर युझरनं तर असंही म्हटलं आहे की तिला हा नंबर एकदम जुन्या सोनी एरिक्सनच्या फोनमध्येही मिळाला. त्यात तर तिचं आधार येण्याआधीचं सिम होतं आणि त्या फोनमध्ये एम-आधार किंवा पेटीएमसारखं कुठलं ॲप पण इन्स्टॉल केलेलं नाही. 

या प्रकारावर ट्विटरवर नवनवीन थियरी मांडल्या जात आहेत. काही अॅप्स आपल्याला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये छेडछाड करण्याची परवानगी मागतात आणि आपण ती देतो. अशाच एखाद्या अॅपमुळे UIDAI चा नंबर सेव्ह झाला असावा अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे काहीजण म्हणतायत की यामागे सिमकार्ड कंपनी असावी. काहीजण तर हेही म्हणत आहेत की यात मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा हात असावा. 

राव, ही चर्चा होत असताना आणखी एक माहिती आली आणि धक्काच बसला. या क्रमांकावर फोन केल्यावर समजलं की हा अवैध नंबर (invalid) आहे. कुछ तो गडबड है दया !!

राव, ट्विटरवर हा गदारोळ सुरु असताना शेवटी UIDAI ने याबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलंय हा नंबर आम्ही सेव्ह केलेला नाही. पुढे त्यांनी म्हटलं की आम्ही कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडर सोबत हात मिळवणी केलेली नाही. हा नंबर अवैध आहे. आधारकार्डची हेल्पलाईन १९४७ असून ती आजही चालू आहे.

राव, UIDAI ने हा नंबर सेव्ह केलेला नाही मग कोणी केला असावा ? आपल्या मोबाईल मध्ये शिरून नंबर सेव्ह करणं इतकं सोप्पं असेल तर आणखी काय काय गोष्टी होऊ शकतात ?

असो, आता तुम्ही आपला फोन चेक करा आणि आम्हाला सांगा UIDA चा नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे का. नंबर असेल तर स्क्रीनशॉट शेअर करायला विसरू नका.

 

आणखी वाचा :

TRAI चे चेअरमन शर्मा यांनी दिलं आधार डेटा लीक करण्याचं चॅलेंज.. आणि हॅकर्सनी ट्विटरवर त्यांची कुंडलीच मांडली की हो

नवं पॅनकार्ड बनवा, जुन्यामधली माहिती अपडेट करा आणि तेही घरबसल्या !!

तुमचा आधार कार्ड आतापर्यंत किती वेळा वापरला गेला आहे ? माहित करून घेण्यासाठी हे जरूर वाचा !!

टॅग्स:

Bobhatamarathi newsmarathi bobhatabobhata news

संबंधित लेख