पेट्रोल आणि डीझेल ज्वालाग्राही आहे हे तर वैज्ञानिक सत्य आहे. त्याहूनही मोठं सत्य हे आहे की पेट्रोल डीझेलचा भाव जास्तच ज्वालाग्राही आहे. साहजिकच आहे की ज्या देशात ७०% हून अधिक क्रूड ऑईल (कच्चे तेल) आयात केले जाते त्या देशाचे राहणीमान कच्चे तेल आणि डॉलरचा बाजार भाव यावरच अवलंबून असते. आपली परिस्थिती अशी आहे जशी ‘आई जेवायला घालेना, बाप भिक मागू देईना’.
ऑगस्ट पासून पेट्रोल आणि डीझेलच्या किमती भडकायला सुरुवात झाल्या. हे सत्र आजवर कायम आहे. हा लेख लिहिताना आलेल्या बातमीनुसार आज पेट्रोल १४ तर डिझेल १५ पैशांनी महागलं आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत ८८.२६ रुपये प्रतिलिटर आहे तर डीझेलची किंमत ७७.४७ रुपये प्रतिलिटर आहे. आपल्या सर्वांनाच पडणारा प्रश्न म्हणजे आपल्या देशात या किमती आहेत तर जगभरातल्या देशांमध्ये किती असतील ?
याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही घेऊन आलो आहोत. चला तर बघूया जगातल्या प्रमुख देशांमध्ये पेट्रोलची किंमत किती आहे !!
(खालील आकडे २०१८ मधील आहेत. सर्व किमती भारतीय चलना प्रमाणे)







