बंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं !!

बंदूक बंद पडल्यावर या पोलिसाने ते केलं जे आजवर कोणत्याही पोलिसाने केलं नव्हतं !!

राव, आज व्हिडीओ ऑफ दि डे मध्ये आम्ही एका महान पोलीस अधिकाऱ्याची अनोखी कर्तबगारी सांगणार आहोत. या पोलिसांने बंदूक जॅम झाल्यावर चक्क तोंडाने ‘ठाय ठाय’चा आवाज काढून चोराला घाबरवलं.

झालं असं की पोलीस चेकिंग मध्ये एक गाडी बॅरीयर तोडून पळाली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून चोराला घेरलं. चोराने पोलिसांवर फायरिंग सुरु केली. राव, मग असं काही घडलं की इतिहास घडला. एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक बंद पडली. हा पोलीस कदाचित फिल्म्स जास्त बघत असावा. त्याने लगेच तोंडातून ठाय ठायचा आवाज काढून चोरांना घाबरवलं.

राव, या पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोक हसून हसून बेजार होतायत. गमतीचा भाग वेगळा पण अशा ‘कर्तबगार’ पोलिसाची योग्य ती दखल घेण्यात आली असून त्याची ‘हत्यार प्रशिक्षणासाठी’ रवानगी करण्यात आली आहे. 

एक चांगली गोष्ट म्हणजे चोर शेवटी पकडला गेला. सुदैवाने इतर पोलिसांच्या बंदुका चालत होत्या. एक पोलीस यात जखमी सुद्धा झाला. ज्या चोराला पकडलं त्याच्यावर २५ हजार रुपयांचं बक्षीस होतं. 

राव, शेवटी एक प्रश्न – “बंदुकीच्या गोळीचा आवाज ‘ठाय ठाय’ असा येतो ?”

 

आणखी वाचा :

देशाच्या पहिल्या तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची कहाणी !!!

या बाईने पोलिसांकडे आपले बाळ का दिले ? वाचा हा अनोखा किस्सा !!

पुण्याच्या डिएसपींनी घेतली अनोखी ट्राफिक टेस्ट...बघा भाऊ यातून काय निष्पन्न झालं?

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख