मंडळी, शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजीराजे जाधव (मातोश्री जिजाऊंचे वडील) यांचं एक महत्वाचं चित्र न्यूयॉर्कमध्ये सापडलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील लखुजीराजे जाधव हे एक महत्वाचं व्यक्तिमत्व होतं. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी १६२२ साली हे चित्र काढण्यात आलं होतं.
राव, आपल्या महाराष्ट्रातील एका महत्वाच्या व्यक्तीचं चित्र थेट अमेरिकेत कसं सापडलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? त्याचं काय आहे ना, या मागे सुद्धा इतिहास आहे राव. चला तर पटपट जाणून घेऊ...









