पब्जी बंद झाल्यापासून कित्येकांचा हिरमोड झालेला आपण पाहत आहोत. एका रडणारा मुलगा पब्जी बंद झाल्यावर आपल्या आईला "इथे परिस्थिती काये" सांगतानाचा व्हिडीओ देखील महाराष्ट्रभर वायरल झाला. कालच बंगालमध्ये पब्जी बंद झाल्यामुळे एका मुलाने आत्महत्या केल्याची बातमी देखील आली. अर्थात यापूर्वीही पब्जीच्या वेडात बऱ्याच जणांनी प्राण गमावल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेतच. या सर्वांवरून आपल्या देशात पब्जीने लोकांना किती वेड लावलं आहे हे लक्षात येतं.
पब्जी चाहत्यांसाठी मात्र आता एक खुशखबर आली आहे. पब्जी भारतात परत येण्याची शक्यता आहे. पब्जी भारतासारखे मोठे मार्केट सहजासहजी हातातून जाऊ देणार नाही. यासाठी पब्जीने मोठा निर्णय घेत चीनच्या टेंसेंट कंपनीसोबतची भारतातील भागीदारी संपविण्याचा निर्णय घेतला आहे.





