गेले सहा महिने आपण सगळेच आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलो आहोत. काही नोकरदारांचे पगार कमी झालेत तर काहींच्या नोकर्या गेल्या आहेत. काहींचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. एकूणच पैशाची चणचण अधिकच जाणवायला लागली आहे.
अशा वेळी तुम्हाला फोन आला, " सर, मै अमित, इंडियन कमर्शिअल बँक से बात कर रहा हूं, क्या आपको इस समय लोन की जरूरत है" तर तुम्ही काय कराल?
येत्या सहा महिन्याच्या गरजा डोळ्यासमोर उभ्या राहून, आताच लोन घेतलेले बरे या विचाराने तुम्ही संभाषण चालूच ठेवाल, नाही का? आता कर्ज म्हणजे व्याजाची विचारणा आधीच केलेली बरी या उद्देशाने तुमचा उत्स्फूर्त प्रश्न असेल, "ब्याज कितना है आपके लोनका?"














