पुण्यात इलेक्ट्रिक बस आली, पण लोक नाखूष का आहेत ??

लिस्टिकल
पुण्यात इलेक्ट्रिक बस आली, पण लोक नाखूष का आहेत ??

पुणे परिवहन महामंडळाने (PMPML) आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसचा समवेश करून घेतला आहे. वाढत्या प्रदूषणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट म्हणायला हवी, पण घडलंय भलतंच. इलेक्ट्रिक बसला चार्ज करण्यासाठी चक्क डीझेलवर चालणाऱ्या जनरेटरचा वापर केला जातोय. गोष्ट एवढीच नाही, तर हा जनरेटर एका बसपेक्षा जास्त डीझेल पीत असल्याचं दिसून आलं आहे.

हा व्हिडीओ पाहा.

या व्हिडीओ मध्ये पुणे परिवहन महामंडळाच्या बसला चार्ज करण्यासाठी डीझेलवर चालणाऱ्या जनरेटरचा वापर होताना दिसत आहे. व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे मात्र समजलेलं नाही. ही बस PMPML ची आहे का असा प्रश्न पडला असेल तर बसवर असलेला लोगो बघा.

पुणे मिररच्या बातमीप्रमाणे PMPML च्या काही बस चालकांच्या मते जनरेटरला बसपेक्षा जास्त डीझेल लागत आहे. याचा अर्थ आपल्याकडे अजून इलेक्ट्रिक वाहनांना साजेशी यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. इलेक्ट्रिक वाहन आणण्यापूर्वी चार्जिंग पॉइंट आणि इतर यंत्रणा आणणे गरजेचं आहे.

PMPML ने या गोष्टीला खोटं ठरवलं आहे. त्यांनी म्हटलंय की बस जरी PMPML ची असली तरी ती त्यांच्याकडून चार्ज करण्यात आलेली नाही. हैद्राबादच्या कारखान्यातून पुण्याकडे येत असताना मार्गात ड्राईव्हरकडून ती चार्ज करण्यात आली होती.

मंडळी, खरी गोष्ट काहीही असली तरी एक मात्र नक्की की भारतात इलेक्ट्रिक वाहन आणण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख