कोरोनामुळे अनेक लोकांच्या हातातली कामे गेली आहेत. या सर्व परिस्थितीचा सामना कसा करावा हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे!! पण काही लोकांना मात्र अशा अडचणीतसुद्धा संधी दिसत असते.
पंजाब मधील जिरकापुर येथील ४० वर्षांचे धनीराम सग्गु नावाचे गृहस्थ सुतारकाम करतात. चंदिगढ पासून काही अंतरावर असलेले हे गाव आहे. लॉकडाऊन झाल्याझाल्या त्यांच्या हातातून काम गेलं. पण निराश न होता काहीतरी वेगळे करण्याचा त्यांनी निश्चय केला. मग काय? धनीराम कामाला लागले आणि भारताच्या आत्मनिर्भर होण्याच्या स्वप्नात हातभार लावू शकेल, असे काम त्यांनी करून दाखवले आहे.






