एक काळ असा होता की टाईम्स ऑफ इंडिया वा महाराष्ट्र टाईम्स पेपर आला की बातम्यांच्याहि आधी त्यातील आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांकडे लक्ष जायचं आणि चेहऱ्यावर स्मित फुलायचं. हे ‘यू सेड इट’ हे पॉकेट कार्टून म्हणजे आर. के. लक्ष्मणची सामाजिक परिस्थितीवर खिल्ली असायची ! आणि हे सर्व म्हणजे बोचकारे वा ओरबाडणे नसायचं तर त्यातून सामाजिक आणि राजकीय कमतरतेवर गुळगुळीत दाढी केल्यासारखं पातं फिरायचं. म्हणजे एकप्रकारे खरी हजामतच पण रक्तबंबाळ न करणारी !

आज टाईम्स ऑफ इंडिया वा मटा येतो त्यात व्यंगचित्र प्रकार अभावानेच दिसतो.पण हजारो वाचकांना मात्र आज 'लक्ष्मण' असता तर त्याने कशी धमाल उडवली असती अशीच हटकून आठवण येते!
हे आज पुन्हा सांगायचे कारण २४ ऑक्टोबर २०२१ ला त्यांची जन्मशताब्दी आहे.




