रतन टाटा हे नेहमीच चांगल्या अर्थाने चर्चेत असतात. गेल्या आठवड्यात त्यांचा तरुणपणातला फोटो व्हायरल झाला होता. यावेळी ते त्यांच्या एका केमेंटमुळे व्हायरल झाले आहेत.
रतन टाटांना एका तरुणीने छोटू म्हटलं....त्यांची प्रतिक्रिया बघून कौतुक कराल !!


त्याचं झालं असं, की रतन टाटा यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये इन्स्टाग्राम जॉईन केलं, नुकतंच त्यांचे १० लाख फॉलोअर्स पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांनी आभार मानणारी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टला प्रतिसाद देताना रेहा जैन नावाच्या युझरने त्यांना उद्देशून "Congratulations chhotu," म्हटलं. या कमेंटवर अर्थातच इतर युझर्स भडकले, त्यांनी तिला ट्रोल केलं. तिने आपली बाजू मांडताना म्हटलं, की ‘त्यांच्यावरच्या प्रेमामुळे मी त्यांना काहीही म्हणू शकते.’

यानंतरही लोक तिला ट्रोल करत राहिले, हा सगळा प्रकार बघून रतन टाटा यांनी स्वतः आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, ‘आपल्या सगळ्यांमध्ये एक लहान मुल दडलेलं असतं. कृपया या तरुण मुलीला आदराने वागवा.’
त्यांच्या या कमेंटनंतर युझर्सनी त्यांच्या या साधेपणाबद्दल त्यांचं कौतुक केलं. या केमेंटला ४००० लाईक्स मिळाले आहेत. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट पाहा.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१