गेल्या काही वर्षात १ रुपयाची किंमत घसरली आहे. आजही जुने लोक ‘त्याकाळी १ रुपयात काय काय यायचं’ या संदर्भातली वाक्य म्हणताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का, की १ रुपयाची किंमत कमी झाली असली तरी १ रुपयाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च हा तेवढाच आहे ? नाही माहित ? हे खुद्द रिझर्व बँकेने उघड केलंय राव.
मंडळी, रिझर्व बँकेने ‘इंडिया टुडे’च्या RTI ला (माहितीचा अधिकार) दिलेल्या उत्तरात नाणी उत्पादनासंदर्भात माहिती दिली आहे. १ रुपयाचा एक नाणं तयार करण्यासाठी १.११ एवढा खर्च येतो. म्हणजे १ रुपया तयार करण्यासाठी त्याच्या किमतीच्या ११ पैसे जास्त मोजावे लागतात. हा खर्च जास्त का याचं उत्तर मिळालेलं नाही. रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीतून आणखी महत्वाच्या गोष्टी समजल्या आहेत ते जाणून घेऊया.
मुंबईच्या टाकसाळीने नाण्यांच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च सांगितलेला नाही. मुंबई शाखेच्या म्हणण्याप्रमाणे माहिती अधिकाराच्या Section 8 (1) (d) प्रमाणे हे एक trade secret म्हणजे व्यापारातील गुप्त माहिती आहे. पण याउलट हैद्राबादच्या टाकसाळीने सगळी माहिती दिली आहे. हैद्राबादच्या टाकसाळीकडून मिळालेल्या माहितीत पुढील आकडे सांगण्यात आले आहेत.






