सचिनचा स्मार्टफोन कोण कोण घेणार? : आज लॉन्च होतोय...

सचिनचा स्मार्टफोन कोण कोण घेणार? : आज लॉन्च होतोय...

मंडळी, सचिनच्या समस्त चाहतेवर्गासाठी एक मस्त बातमी आहे. आज, म्हणजे ३ मे ला सचिनचा स्मार्टफोन लॉन्च होतोय. सचिनचा स्मार्टफोन म्हणायचं कारण म्हणजे या स्मार्टफोनचं नावच srt.phone असं आहे. SRT म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर, हे वेगळं सांगायला नको.

हा स्मार्टफोन स्मार्टरॉन इंडिया (Smartron) या कंपनीकडून बनवण्यात आलाय. या कंपनीमध्ये स्वतः सचिनने गुंतवणूक केलीये आणि तोच या स्मार्टफोन कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे. त्यामुळे कंपनीनं या सचिन स्मार्टफोनचं जोरदार प्रमोशन चालू केलंय.

Ready for a surprise? We're excited & can’t wait to share it with you all. #srtphone is on its way on 3rd May'17, are you ready? #TwoOfAKind pic.twitter.com/mw5a2NYMHw

— Smartron (@smartronindia) April 28, 2017

अधिकृतरित्या कंपनीतर्फे या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती मिळाली नसली तरी यामध्ये ४ जीबी रॅम आहे असं कळतंय. याची किंमतही १५ हजारांच्या आसपास असू शकते. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनच्या बॅक पॅनेलवर सचिनची स्वाक्षरीही असणार आहे.

टॅग्स:

sachin tendulkar

संबंधित लेख