आजकाल 'व्हायरल व्हिडीओ' हा शब्द अगदी रोजचाच झालाय! काही व्हिडिओमध्ये खरंच काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात त्याचं कौतुकही वाटतं. पण काही व्हिडिओ पाहून धक्काच बसतो. कारण प्रसिद्धी साठी कोणाच्या डोक्यात काय कल्पना असतात हे कोणी सांगू शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झालाय. ब्रिटनमधील एका भारतीय रेस्टॉरंटच्या मालकाने चक्क सामोसा अंतराळात पाठवलाय.
ही बातमी म्हणजे एखादा जोक वाटेल पण हे प्रत्यक्षात घडलंय. नीरज गधेर यांचे ब्रिटनच्या बाथ भागात 'चायवाला' नावाचे भारतीय रेस्टॉरंट आहे. त्यांनी सामोसा पॅक करून हेलियम फुग्याच्या सहाय्याने हा प्रयोग करायचे ठरवले. पण हा सामोसा अंतराळात पोहोचण्याच्या आधीच क्रॅशलॅंड झाला.





