एकेकाळी पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जायचे. जसजसे शहर वाढले वाहतूक वाढली, तशी ही सायकल कुठेतरी कोपऱ्यात जाऊन धूळ खात पडली. पुण्याची ही ओळख पुसली जाते का काय अशी भीती असतानाच एका तरुण सिनिअर्सच्या ग्रुपने एक अनोखी कामगिरी केली आहे. पुणे ते कन्याकुमारी हे १६००किमीचे अंतर ८ सीनिअर सिटीझन्सनी अवघ्या १४ दिवसांत पूर्ण केले आहे. तेही कोणत्याही वाहनाशिवाय. फक्त सायकलवर स्वार होऊन त्यांनी हे ध्येय गाठले आहे.
अनिल पिंपळीकर ( वय - ७०), प्रकाश टेंभेकर ( वय - ६१), अविनाश मेढेकर ( वय - ६३), संजय जोशी ( वय - ६२),मिलिंद सैंदाणे ( वय - ६३), दत्ता गोखले (वय - ६३), प्रदीप भवाळकर ( वय - ६५) आणि पद्माकर आगाशे ( वय - ६८) अशी या तरुण सिनिअर्सची नावे आहेत. पुण्यात यंग सिनियर्स नावाची संस्था आहे जिथे ५०-८० वयोगटाचे जेष्ठ मंडळी सायकलिंग करतात. त्यांच्यातर्फे हे आठजण प्रवासाला निघाले. ५ जानेवारीला ते पुण्याहून निघाले आणि कन्याकुमारीला १८ जानेवारीला पोहोचले. एकूण १६०० किमीचे अंतर त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांच्याबरोबर एक वैद्यकीय तज्ञांची टिमदेखील होती. सायकलिंग द्वारे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण जागृतीही त्यांनी केली.




