भारतीय वंशाचे लोक जगभरात अनेक देशांमध्ये राहतात. ते केवळ त्या त्या देशातील सामान्य नागरिक आहेत असं नाही, तर त्यांनी त्या देशांमध्ये मोठमोठ्या पदांपर्यंत झेप घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी आपल्या नव्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासह अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. अमेरिकेच्या इतिहासात कमला हॅरिस सर्वोच्च पदावर असणारी भारतीय वंशाच्या महिला आहेत. याव्यतिरिक्त २० भारतीय-अमेरिकन इतर पदावर नेमले गेले आहेत. या २० पदापैकी १३ या महिला आहेत. त्यातल्या काही भारतीय अमेरिकन बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
बायडन-हॅरिस सरकारमध्ये या १२ भारतीय वंशांच्या लोकांची वर्णी लागली आहे...यादी पाहून घ्या !!


१. नीरा टंडन
५० वर्षीय नीरा टंडन यांची व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेटच्या संचालकपदी (Director for the White House Office of Management & Budget) नेमणूक झाली आहे. या नेमणुकीने या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला बनल्या आहेत.

२. डॉ विवेक मूर्ती:
४३ वर्षीय डॉ. विवेक मूर्ती यांची अमेरिकन सर्जन जनरल म्हणून त्यांची निवड झाली आहे. यापूर्वी ते ओबामा प्रशासनात सर्जन जनरल म्हणून कार्यरत होते. ते बायडेन यांच्या COVID-19 टास्क फोर्सचे अध्यक्षही असतील.

3. वनिता गुप्ता
४५ वर्षीय वनिता गुप्ता यांची सहयोगी Associate Attorney General at the Department of Justice म्हणून नेमणूक झाली आहे. यापूर्वी त्यांनी ओबामा प्रशासनात नागरी हक्क विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. बायडेन यांनी गुप्ता यांना अमेरिकेतील सर्वात "आदरणीय" नागरी हक्क वकील म्हणून संबोधित केले.

४. उझरा झेया:
उझरा झेया यांची नागरी सुरक्षा, लोकशाही आणि मानवाधिकार राज्य सचिवपदी नेमणूक झाली आहे. झेया या काश्मिच्या असून पूर्वी त्यांनी अलायन्स फॉर पीसबिल्डिंगच्या सीईओपदी काम केले आहे.

५. सबरीना सिंग:
सबरीना सिंग यांची व्हाइट हाऊसच्या पहिल्या महिला Deputy Press Secretary म्हणून नेमणूक केली आहे. यापूर्वी २०२० च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्या उपराष्ट्रपती हॅरिसच्या Press Secretary होत्या. प्रशासनाचा एक भाग म्हणून त्यांनी आपली पहिली प्रेस ब्रिफिंग घेत असल्याचे ट्विट करून जाहीर केले आहे.

६. समीरा फाजिली:
काश्मिरच्या समीरा फाजिली यांची व्हाईट हाऊसमधील US National Economic Council (एनईसी) येथे उपसंचालकपदी निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी फेडरल रिझर्व बँक अटलांटा मध्ये काम केलं आहे.

७. भारत राममूर्ती:
भारत राममूर्ती यांची व्हाईट हाऊस राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी यापूर्वी सिनेटचा सदस्य एलिझाबेथ वॉरेन यांच्या राष्ट्रपती पदाच्या मोहिमेत एक मदतनीस म्हणून काम केले होते.

८. विनय रेड्डी:
विनय रेड्डी यांची भाषण लेखन संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते मूळचे तेलंगणा येथील आहेत. उपाध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांनी बायडेन यांचे भाषण लेखक म्हणून काम पाहिले होते. या पदावर ते पहिले भारतीय अमेरिकन आहेत. बायडेन यांचं पहिलं अध्यक्षीय भाषणही विनय रेड्डी यांनीच लिहिले होते.

९. माला अडीगा:
माला अडीगा यांचे फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांच्या पॉलिसी डायरेक्टरपदी नियुक्ती झाली आहे. माला या वकील आहेत. यांचे आईवडील अमेरिकेत डॉक्टर आहेत. त्यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील कक्कुंजे गावचे आहे.

१०. गरिमा वर्मा:
गरिमा वर्मा यांची प्रथम महिला (first lady) कार्यालयाच्या डिजिटल संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी पॅरामाउंट पिक्चर्स आणि एबीसी नेटवर्क बरोबर काम केले आहे. चित्रपट आणि करमणुक क्षेत्राचाही त्यांना अनुभव आहे.

११. वेदांत पटेल:
वेदांत पटेल यांची राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक पत्रकार सचिव म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांनी बायडेन-हॅरिस उद्घाटन समितीचे वरिष्ठ प्रवक्ते म्हणून काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी कॉंग्रेच्या प्रमिला जयपाल आणि कॉंग्रेसचे सदस्य माईक होंडा यांच्यासाठीही काम केले आहे.

१२. गौतम राघवन
गौतम राघवन यांची अध्यक्षीय कर्मचार्यांच्या कार्यालयात उपसंचालकपदी (Deputy Director at the office of Presidential Personnel) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी ओबामा यांच्या काळातही associate director of Public Liaison म्हणून काम पाहिले होते.
याशिवाय सुमोना गुहा(दक्षिण आशिया परराष्ट्र धोरण खाते), शांती कलथील (लोकशाही आणि मानवी हक्क समन्वयक), सोनिया अग्रवाल (Senior Advisor for Climate Policy & Innovation), नेहा गुप्ता (Associate Counsel), रीमा शाह (व्हाईट हाऊसच्या कार्यालयाच्या उप-सहयोगी सल्लागार) , तरुण छाबरा (Deputy Associate Counsel), विदूर शर्मा (Policy Advisor for Testing), इत्यादी भारतीयांची महत्त्वाच्या पदी निवड झाली आहे.
भारतातून अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या १९६०च्या दशकात वाढली होती. मग पुढच्या चार दशकांमध्ये हळूहळू लाखो भारतीय लोक अमेरिकेत स्थायिक झाले. एका अभ्यासानुसार, सध्या अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या भारतीय लोकांची संख्या आता ४० लाखांवर आहे. राजकारणात भारतीयांची झालेली नियुक्ती ही नक्कीच सर्व भारतीयांसाठी अभिमानाची म्हणावी लागेल.
लेखिका: शीतल दरंदळे
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१