(इ- रिक)
आजकाल प्रदूषणामुळे पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याचे आपल्याला खूप जाणवत आहे. या प्रदूषणामुळे इतरही समस्या आ वासून समोर उभ्या राहिलेया आपल्याला दिसत आहेत. ग्लोबल वार्मिंग तर आहेच, पण अवेळी पाऊस आणि इतरही अशा बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.
आपल्या वाहनांमधून बाहेर फेकल्या जाणाऱ्या धुरामुळेही अशा समस्या वाढत आहेत याची आपण नोंद घेतली पाहिजे. मग या गोष्टीला पर्याय उपलब्ध आहे काय? होय, इलेक्ट्रिक व्हेहिकल्स या गोष्टींवरील सर्वात उत्तम उपाय आहे. सिंगापूरमधील शाडो कंपनीने भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेहिकल्सचे उत्पादन करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी मुख्यतः ई-रिक्षा म्हणजेच इलेक्ट्रिक रिक्षांचे उत्पादन भारतात करणार आहे. या रिक्षांचा वापर प्रवाशांसाठी तसेच मालवाहतुकीसाठी ही करता येणार आहे. या रिक्षांमध्ये काय विशेष आहे ही आज जाणून घेऊयात...







