जसजसा काळ बदलतोय तसतश्या गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पध्दतीही. गुन्हा करण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या वापरून पोलिस यंत्रणेला चकवा देणारे अनेक सराईत गुन्हगार आज आपण बघतोय. पण गुन्हेगारांनी उभं केलेलं हे आव्हान मोडून काढण्यात आज तपास यंत्रणांना मोलाची मदत होतीय ती आपल्या दैनंदिन वापरातल्या स्मार्ट उपकरणांची. क्राईम पॅट्रोलमध्ये पाहातो ते मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्डस याच्यापलिकडेही बरंच काही यात येतं.
आज जवळपास ८५ टक्के गुन्हे तपासांमध्ये अशा डिजिटल पुराव्यांची निकड भासते. या डिजीटल पुराव्यांमध्ये तुमच्या इमेल्स आणि लॅपटॉपपासून ते बिटकॉईन वॉलेटस्, वेब सर्व्हर लॉग्स, IoT (आपापसांत एकमेकांशी कनेक्ट असलेली स्मार्ट संगणकीय उपकरणं) अशा ८५हून अधिक स्त्रोतांचा समावेश होतो. या लेखमालिकेत आपण पाहणार आहोत असे काही किस्से जिथं पोलिसांनी अशा स्मार्ट उपकरणांची मदत घेऊन अचूक गुन्हेगार ओळखले....







