इंटरनेट नावाची विलक्षण भन्नाट गोष्ट जगात आली आणि अवघे जग बदलून गेले. माणसाच्या इतिहासातली सर्वात महत्वाची क्रांती असंही याचं वर्णन करता येऊ शकतं. आज अर्ध्याहून अधिक जग इंटरनेटशी जोडले गेले आहे. पण जगाचा इंटरनेटचा इतिहास हा जेमतेम ३० वर्ष जुना आहे. म्हणजे तसा इंटरनेटचा शोध १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात लागला, पण अमेरिकेतल्या सामान्य लोकांपर्यंत ते पोचायला तसं १९९१ साल उजाडावं लागलं. भारतात तर ते याहून उशीरा पोचलं. म्हणून तसा सर्वसामान्य जगाचा इंटरनेटचा इतिहास हा जेमतेम ३० वर्ष जुना आहे असं म्हटलं जातं.
इंटरनेटवरचा सर्वात पहिला फोटो आणि तो अपलोड होण्यामागची गोष्ट!!


आज आपण इंटरनेटवर असंख्य फोटो पाहतो. पण इंटरनेटवर पहिला अपलोड झालेला फोटो कुठला होता हे तुम्हाला माहीत आहे का? तो फोटो आणि त्यासंबंधीची माहिती जाणून घेऊया...
(अपलोड करण्यापूर्वीचा फोटो)
हा पहिला फोटो प्रोमोशनल फोटो होता. काही मुलींचा पॅरडी पॉप ग्रुप होता. या ग्रुपचं नाव Les horrible cernettes होतं. हा एक कॉमेडी बँड होता. सर्न नावाची युरोपियन ऑटोमिक रिसर्च संस्था आहे. या संस्थेच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी हा बँड सुरू केला होता.
स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा इथं या सर्नचं कार्यालय आहे. या ऑफिसमध्ये सेक्रेटरी तसेच काही सायंटिस्टसच्या गर्लफ्रेंड असलेल्या या मुली होत्या. सिल्वानो डी गनारो या सर्नच्या कॉम्प्युटर विभागात ऍनालिस्ट असलेल्या गड्याने हा फोटो घेतला होता. त्याला त्यावेळी कदाचित माहीत देखील नसेल की हा फोटो इतिहास घडवणार आहे.

(अपलोड केलेला फोटो)
१९९२ साली वर्ल्ड वाईड वेबचा निर्माता टिम बर्नर्स ली, याने हा कलर मॅकवरील फोटो व्हर्जन 1 वर एडिट करून अपलोड करण्यापूर्वी gif म्हणून सेव्ह केला. अशा पद्धतीने हा फोटो इंटरनेटवर अपलोड झालेला पहिला फोटो बनला. त्यानंतर काय झाले हे तर सर्व जगानं पाह्यलंच आहे.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१