हिंदीतली एक फार जुनी म्हण आहे.
कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारों |
चीनच्या ‘टँकमॅन’ला बघून ही म्हण आठवते. पांढरा शर्ट, काळी पँट आणि हातात पिशव्या घेतलेला एक साधारण माणूस - ज्याच्याकडे कोणतंही शस्त्र नाही, एका युद्धातल्या रणगाड्यासमोर जाऊन उभा राहतो आणि जागचा हलत नाही हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं होतं. हे रणगाडे शांततेत जात होते असंही नाही. त्यांनी आदल्यादिवशीच शेकडो माणसांचा जीव घेतला होता. चीनमधल्या त्या अज्ञात व्यक्तीने फक्त रणगाड्याला आव्हान दिलं नव्हतं, तर संपूर्ण चीनी दडपशाहीलाच आव्हान दिलं होतं. ही हिम्मत, ही जिद्द ऐतिहासिक ठरली. हा पाहा व्हिडिओ.















