भारतीय पब्लिकला बालविवाह ही संकल्पना काही नवी नाही. आजही कुठल्यातरी खेड्यापाड्यांत अशा घटनांच्या बातम्या कधीकधी वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. बालविवाहामुळे कमी वयात माता होण्याचा प्रसंग बालिकांवर ओढवत असे. पण कितीही म्हटले तरी एका विशिष्ट वयाआधी कोणत्याही मुलीला आई होणे शक्य नसते. पण जगाच्या इतिहासात एक अतर्क्य आणि अविश्वसनीय वाटावी अशी एक घटना घडली होती.
ही घटना घडली होती पेरू देशात. अगदी सुरस, चमत्कारिक आणि तितकीच खोटी वाटावी अशी ती घटना. अवघे ५ वर्षे ७ महिने वय असलेली लीना मेदिना नावाची मुलगी आई झाली होती. लिनाचा जन्म १९३३ सालचा. लहान मूल म्हटले म्हणजे खेळण्या बागडण्याचे वय. पण अचानक लिनाचे पोट आपोआप वाढायला लागले आणि तिच्या घरचे काळजीत पडले. पण खरे संकट तेव्हा ओढवले जेव्हा डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले.









