बाबुराव गणपतराव आपटेचं स्वप्न आठवतंय? ‘नल खोला की गिलासमें दारू!! मैं उपर एक टंकी बिठयेगा, सीधा उसमें दारू भरनेका, ये रोज रोज का खिटपिट मेरेको नहीं मंगता!!’
नळाच्या तोटीतून पाण्यासारखी दारू यावी ही तळीरामांसाठी स्वप्नवत असलेली कल्पना केरळच्या लोकांसाठी खरी ठरली आहे. केरळच्या त्रिसूर जिल्ह्यातल्या चालाकुडी येथील सोलोमन अॅव्हेन्यूमध्ये राहणाऱ्या १८ कुटुंबियांसाठी हा धक्कादायक प्रकार होता. रविवारी संध्याकाळी या भागात दारूचा वास येऊ लागला. दुसऱ्या तर घरात येणाऱ्या पाण्यालाच दारूचा वास येऊ लागला. पाणी प्यायल्यावर समजलं की पाण्यात दारू आहे.






