भारतात आपल्या नेत्यांसाठी जीव द्यायला देखील तयार असलेले असे अनेक कार्यकर्ते सापडतात. काहीजण अशी नुसती भावनाच बाळगत नाहीत, तर प्रसंगी जीव देतातही. भारतात काही नेत्यांच्या मृत्यूनंतर आत्महत्या केलेल्या लोकांचीही देखील अनेक उदाहरणे आहेत. पण परदेशात एखाद्या नेत्यासाठी असा जीव ओवाळून टाकणारे मात्र सहसा सापडत नाहीत.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे मंदिर त्यांच्या एका चाहत्याने भारतात बनविले होते. बुसा कृष्णन असे त्यांचे नाव. त्यावेळी अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला होता. पण आता जे घडले ते वाचून कृष्णन यांचे खरोखर ट्रम्प यांच्यावर खूप प्रेम होते हेच सिद्ध होईल.






