हे २६ किलो तांदूळ सांगत आहेत जेफ बेझोसची एकूण संपत्ती....कसं ते समजून घ्या !!

लिस्टिकल
हे २६ किलो तांदूळ सांगत आहेत जेफ बेझोसची एकूण संपत्ती....कसं ते समजून घ्या !!

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेझोसचं नाव पहिल्या पाचमध्ये येतं. गेल्यावर्षी तर तो पहिल्या क्रमांकावर होता. जेफ बेझोसकडे नक्की किती पैसा आहे असा प्रश्न पडला ना? एका टिकटॉक स्टारने याचं अगदी सोप्या भाषेत उत्तर दिलं आहे.

हम्फ्रे यंगने तांदळाच्या दाण्यांच्या आधारे जेफ बेझोसची संपत्ती दाखवून दिली आहे. व्हिडीओमध्ये त्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेऊया.

१ लाख डॉलर्स म्हणजे एक दाणा. म्हणजे १० दाणे असतील तर १ मिलियन (१० लाख) डॉलर्स. याचा अर्थ १ बिलियन (१०० कोटी) दाखवण्यासाठी १०,००० दाणे.

हा व्हिडीओ तयार करताना जेफ बेझोसची एकूण संपत्ती १२२ बिलियन डॉलर्स एवढी होती. आता हिशोब करा. १२२ बिलियन डॉलर्स दाखवण्यासाठी हम्फ्रेला तब्बल २६ किलो तांदळाची गरज लागली. तुम्हाला अंदाज आलाच असेल की जेफ बेझोसकडे किती गडगंज पैसा आहे.

हम्फ्रे यंगची आयडिया लोकांना भलतीच आवडली आहे. या व्हिडीओला ९२,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत, तर ३० लाख पेक्षा जास्त लोकांनी तो रिट्विट केला आहे. आतापर्यंत तब्बल २८ लाख लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे.

हम्फ्रे यंग हा स्वतः ई-कॉमर्स सल्लागार म्हणून काम करतो. टिकटॉकवर त्याचे २ लाख फॉलोअर्स आहेत.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख