व्हिडीओ ऑफ दि डे : अरबी शेखची दादागिरी...भारतीयांना जबरदस्ती केलं कैद !!

व्हिडीओ ऑफ दि डे : अरबी शेखची दादागिरी...भारतीयांना जबरदस्ती केलं कैद !!

AFC एशियन कप फुटबॉल स्पर्धेत भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात सामना रंगला. या सामन्यात भारताचा पराभव झाला, पण या पराभवापेक्षा जास्त चर्चा रंगली ती एका व्हिडीओची.

मंडळी, या व्हायरल व्हिडीओ मध्ये एका अरबी माणसाने भारतीयांना कैद केलं आहे. कारण काय, तर हे भारतीय UAE मध्ये राहून भारताला सपोर्ट करतायत. तो त्यांना विचारतो की तुम्ही कोणाला सपोर्ट करता ? आत बंद असलेले लोक भारताचं नाव घेतात तेव्हा तो त्यांना उपदेश देतो, “तुम्ही UAE मध्ये राहून भारताला सपोर्ट करता, हे चुकीचं आहे. तुम्ही UAE ला सपोर्ट केलं पाहिजे...” यानंतर तो त्यांना पुन्हा विचारतो. जेव्हा ते लोक UAE चं नाव घेतात तेव्हा तो त्यांना सोडून देतो.

स्रोत

मंडळी, भारत काय आणि UAE काय सगळीकडेच असा प्रकार म्हणजे गंभीर गुन्हा मानला जातो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर UAE पोलिसांकडून त्या माणसाचा शोध घेण्यात आला. UAE च्या अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याला जाब विचारल्यानंतर तो जे म्हणाला ते काहीतरी भलतंच होतं.

तो म्हणाला की हा व्हिडीओ म्हणजे एकप्रकारचा ‘जोक’ आहे. हे सगळं ठरवून केलेलं होतं. त्याने पुढे सांगितलं की मी ज्यांना कैद केलं होतं ते माझ्याच शेतावर काम करणारे भारतीय मजूर आहेत. त्यांच्यातील एक तर गेल्या २२ वर्षापासून माझ्यासोबत काम करतो. आम्ही एकाच ताटात जेवतो. मी त्यांना मारलेलं नाही किंवा त्यांना कैदही केलं नव्हतं.

मंडळी, आता हा व्हिडीओ पुन्हा बघा. हा व्हिडीओ म्हणजे तो म्हणतोय त्याप्रमाणे ‘जोक’ वाटतो का ? सांगा बरं !!  

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख