आजची पहिली खुशखबर घ्या राव. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राच्या पठ्ठ्यांनी यशाची गुढी उभारली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत पहिल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या ५ जणांची निवड झाली आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या ‘सृष्टी जयंत देशमुख’ हिने देशात पाचवा क्रमांक पटकावला आहे.
मंडळी, सप्टेंबर २०१८ साली लोकसेवा आयोगाची परीक्षा पार पडली होती. शासकीय सेवा (आयएएस), विदेश सेवा (आयएफएस), पोलीस सेवा (आयपीएस), गट अ आणि गट ब या पदांसाठी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. देशभरातून ७५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पैकी महारष्ट्राचे ८५ ते ९० विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे.






