मुलासाठी गर्लफ्रेंड शोधायला निघाली आई, आली पोलिसांच्या वाँटेड लिस्टवर...नक्की काय आहे हा प्रकार ?

मुलासाठी गर्लफ्रेंड शोधायला निघाली आई, आली पोलिसांच्या वाँटेड लिस्टवर...नक्की काय आहे हा प्रकार ?

मंडळी, आई मुलांसाठी काहीही करू शकते. आजचं ताजं उदाहरण घ्या ना, एक आई आपल्या मुलासाठी चक्क गर्लफ्रेंड शोधायला निघाली होती. ते बिग बँग थेअरीमध्ये राज कुथरपल्ली गर्लफ्रेंड मिळत नाही म्हणून बाबांना त्याचं लग्न ठरवून द्यायला सांगतो. पण हे आपल्या भारतीय संस्कृतीत चालतं हो, परदेशात बघा काय झालं हे!!

‘व्हॅलेंटाईन डे’ला आपल्या मुलाला ‘डेट’ करू शकेल अशी मुलगी शोधण्यासाठी एक आई अमेरिकेतल्या टॉसन, मेरीलँड भागात फिरताना आढळली आहे. ती मोबाईल मधला मुलाचा फोटो दाखवून मुलींना माझ्या मुलाला डेट करणार का अशी विचारणा करत होती.

ती तासभर शोधाशोध करताना दिसली. तिला कोणी मुलगी सापडली की नाही हे तर लांबच राहिलं, पण तिच्याविरुद्ध अनेक विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केली आहे. मुलासाठी गर्लफ्रेंड मिलो वा न मिळो ती मात्र पोलिसांच्या वाँटेड लिस्ट मध्ये आली भाऊ.

आईच्या या वेड्या मायेबद्दल तुम्ही काय म्हणाल ??

टॅग्स:

marathiBobhatabobhata marathibobhata newsmarathi newsbobatamarathi infotainment

संबंधित लेख