नागालँडची ओळख तशी तिथल्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीमुळे आहे. त्याचप्रमाणे नागालँड मधमाशांच्या पोळ्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तिथे लोकं मधमाशा आणि मधाचा व्यवसाय करतात. एवढेच नाही, तर पूर्ण नागालँडमध्ये ५ डिसेंबरला मधमाशी दिवससुद्धा साजरा करण्यात येतो.
मंडळी, मधाच्या पोळ्याचे काही खरे नसते. एखाद्याच्या घरात ते बसले म्हणजे घरात येण्याजाण्याचे वांदे होतात. चुकून त्यांना कुणाचा धक्का लागला तर थेट जीवाचा धोका निर्माण होतो. मधमाश्यांचे पोळे उठल्याने अनेक लोकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. एखाद्या झाडावर पोळे असेल तर लोक त्या झाडाखाली फिरणे देखील बंद करतात. कधीकधी पूर्ण इमारतसुद्धा रिकामी करावी लागते. त्यातही काही धडाकेबाज गडी असतात ते अंगावर ओरखंडाही येऊ न देता मोठेमोठे मधमाश्यांचे पोळे उध्वस्त करतात.





