कधी जिवंत ज्वालामुखी फुटलेला पहिला आहे काय? नुकताच आइसलँडमधील ज्वालामुखीचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय. हा व्हिडीओ ड्रोनद्वारे घेण्यात आलेला आहे. फुटणाऱ्या ज्वालामुखीचा एवढ्या जवळून घेतलेला व्हिडीओ तुम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन जाईल. एकदा पाहून घ्याच.
Seems like my video went full throttle! More on my YouTube channel pic.twitter.com/RzrRniXxPu
— Bjorn Steinbekk (@BSteinbekk) March 22, 2021
आइसलँडमधील ज्वालामुखीचे ड्रोन फुटेज ब्लॉगर ब्योर्न स्टेनबेक यांनी पोस्ट केले आहेत. लाल सूर्याचा गोळा जणू वितळून वाहत येतोय असा भास होतो हा व्हिडीओ बघून होतो. रिकॅनेस द्वीपकल्पातील फॅग्राल्डस (Fagradals) पर्वतावर या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. आईसलँड हवामान कार्यालय (आयएमओ) च्या माहितीनुसार १९ मार्च रोजी सकाळी ८.४५ वाजता हा स्फोट सुरू झाला. उद्रेक होण्याच्या काही तासांपूर्वी १.२ किमीजवळ ३.१ रिश्टर स्केलचा भूकंपही झाला होता.





