कालच एसबीआय ने ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा ४० हजार वरून २० हजार पर्यंत कमी केली. एसबीआय डेबिट कार्डच्या क्लासिक आणि मेस्ट्रो कार्डधारकांना ATM मधून फक्त २०,००० रुपये काढता येतील. अचानक झालेल्या या बदलाचं एक मुख्य कारण आहे ATM मधून होणारी चोरी.
मंडळी, एसबीआय बँकेकडे मागच्या काही काळामध्ये फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. अशा फसवणुकीची उदाहरणं वाढत असल्याने हा एक सर्वात मोठा फसवणुकीचा प्रकार होऊ शकतो असं तज्ञांचं मत आहे.
...पण सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतलेली असतानाही हे चोर ATM मधून पैसे लंपास करतात तरी कसे ? याचं उत्तर आहे ‘स्कीमिंग’. स्कीमिंग पद्धतीने ATM वर हात साफ करून आजवर लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. तुमच्या सोबत असं घडू नये म्हणून आज आम्ही सांगणार आहोत स्कीमिंग म्हणेज काय, तो कसा ओळखायचा आणि त्यापासून सावधान कसं राहायचं ते !!
चला जाणून घेऊया स्कीमिंग’ प्रकारा बद्दल.














