FASTagने टोल भरला नाही तर दुप्पट रक्कम द्यावी लागेल! कसा घ्यायचा हा FASTag?

लिस्टिकल
FASTagने टोल भरला नाही तर दुप्पट रक्कम द्यावी लागेल! कसा घ्यायचा हा FASTag?

ट्राफिक आणि गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी सरकारकडून भारतातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर FASTag अनिवार्य करण्यात आलं आहे. आधी हे FASTag म्हणजे काय ते समजून घेऊ.

FASTag ही टोल भरण्याची नवी पद्धत आहे. FASTag लावलेली कार जेव्हा टोलनाक्यावर येईल तेव्हा चालकाच्या खात्यातून अपोआप टोलचे पैसे चुकते केले जातील. या पद्धतीमुळे कार थांबवून पैसे भरण्याची गरज नाही. सगळा काही कॅशलेस व्यवहार असेल. FASTag काहीसं असं दिसतं

FASTag हे कारच्या समोरच्या काचेवर लावलेलं असतं. FASTag च्या आत रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन सिस्टम बसवलेली असते. या तंत्रज्ञानाच्या आधारे कारची ओळख पटते. FASTag असलेल्या कारला जाता यावं म्हणून तशी खास लेन पण असणार आहे.

FASTag कसा मिळवाल?

FASTag कसा मिळवाल?

भारतातल्या जवळजवळ सर्वच नामांकित बँकांमधून FASTag मिळू शिकतं. FASTag हे ग्राहकाच्या बचत खात्याशी जोडलेलं असेल (savings account. एकदा का तुमचं खातं FASTag सोबत जोडलं गेलं की तुमच्या बचत खात्यातून पैसे कमी केले जातात आणि टोल चुकता केला जातो.

‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या ‘इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन’च्या अंतर्गत FASTag ची कल्पना मांडण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक आणि  कोटक महिंद्र बँक या बँका ‘इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन’चा भाग आहेत.

एक महत्त्वाची बाब म्हणजे बँका FASTag वर फी आकारणार आहे. एसबीआय बँक किती फी आकारणार आहे ते आता पाहूया.

तर, १ डिसेंबरपासून जर तुमच्याकडे  FASTag नसेल आणि तुम्ही FASTag लेनमधून गेलात तर तुमच्याकडून दुप्पट टोल आकारला जाईल.त्यामुळे लवकरात लवकर FASTag मिळवा.

टॅग्स:

bobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi newsbobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobata

संबंधित लेख