देशभरात माणुसकीचे दर्शन घडत असताना माणुसकीचाच एक क्रूर चेहरा पुढे आला आहे. केरळमध्ये एक घटना घडली आहे. तिथल्या काही स्थानिकांनी एका गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके भरून खाऊ घातले. यात तिचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. वन विभागातील काही अधिकाऱ्यांनी हा फोटो सोशल मीडियावर टाकला आणि तो वायरल व्हायला वेळ लागला नाही. हा फोटो बघून लोकांच्या संतापाचा बांध फुटला.
गर्भवती हत्तीणीसोबत असं करणाऱ्यांना उलटं टांगून मिरचीची धुरी द्यायला हवी !!
लिस्टिकल


ही घटना केरळमधील मलप्पूरम येथील आहे. एक भुकेली गर्भवती हत्तीण अन्नाच्या शोधात भटकत होती. तिच्या या परिस्थितीचा फायदा काही लोकांनी उचलायचा ठरवला आणि एका अननसमध्ये फटाके भरून तिला खायला दिला. तिने तो अननस खाल्ला. तिचं तोंड भाजलं, पोटातही जखमा झाल्या.

यात ती हत्तीण प्रचंड जखमी झाली. नंतर तिला वाचवायचा प्रयत्न करण्यात आला. पण तिने जीव सोडला. तिने तिच्या पोटात असलेल्या 18 ते 20 महिन्याच्या लहान बाळासाठी ते अननस खाल्ले होते. पण यात तिच्यासहीत तिच्या बाळाचासुद्धा मृत्यु झाला आहे.
टॅग्स:
Bobhatabobhata marathi
संबंधित लेख

Sports
जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलLifestyle
या ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलLifestyle
खमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१
लिस्टिकलSports
रोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१