बऱ्याचदा इतिहासातल्या घटना वाचताना-ऐकताना इसवीसन पूर्व काळाचा संदर्भ येतो. पण इथं आपला गोंधळ उडतो तो कालगणनेचा. कारण इसवीसन पूर्व काळ हा उलट्या क्रमानं मोजला जातो. पण असं का? चला, समजून घेऊया.
आपण वापरतो ती कालगणना 'ग्रेगोरियन कॅलेन्डर' किंवा ख्रिस्ती कालगणना म्हणून ओळखली जाते. यामध्ये हजारो वर्षांचा काळ सोप्यारीतीने मोजता यावा यासाठी येशूच्या जन्माच्या घटनेला आधारभूत मानलं जातं आणि त्याप्रमाणे इतिहासातला काळ हा दोन भागांत विभागला जातो. येशूच्या जन्मापूर्वीचा काळ हा 'ख्रिस्तपूर्व' (BC or Before Christ) तर येशूच्या जन्मानंतरचा काळ हा 'एनो डोमीनी' (AD or Anno Domini) या उपनामांनी ओळखला जातो.








