सोशल मीडिया जितका फायद्याचा आहे तितकाच तोट्याचा पण ठरू शकणारा विषय आहे, हे तसे घासून गुळगुळीत झालेले वाक्य. त्यात मोठे तथ्य आहेच पण यावर उपाय काय. तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवून महत्वाची गोष्ट त्याला पाठवली आणि त्याने तीच गोष्ट इतरत्र फॉरवर्ड केली तर काय? यात तुमचे महत्वाचे फोटो असू शकतात.
मग काय विश्वास ठेऊच नये काय? आता याचे उत्तर तुमचे तुम्ही शोधा. मात्र यावर थोडीशी का होईना, पण उपाययोजना खुद्द व्हाट्सऍपकडून केली गेली आहे. व्हाट्सऍपने एक नविन फिचर आणले आहे. हे फिचर खरोखर फायद्याचे ठरू शकते.
तुम्हाला आठवत असेल तुमचे मॅसेज ७ दिवसांनी आपोआप गायब होऊ शकतील असे फिचर व्हाट्सऍपने आणले होते. पण ७ दिवसांत एखादा मॅसेज कितीही फॉरवर्ड होऊ शकतो. तर यावर नविन उतारा व्हाट्सऍप घेऊन आले आहे.





