व्हॉटसअॅपच्या या नंबर वरून आता फेक मेसेज ओळखता येणार....नंबर लिहून घ्या !!

लिस्टिकल
व्हॉटसअॅपच्या या नंबर वरून आता फेक मेसेज ओळखता येणार....नंबर लिहून घ्या !!

मंडळी, भारतात फेक मेसेज साथीच्या रोगाप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगांवर पसरत असतात. ११ एप्रिल पासून निवडणुका सुरु होत आहेत. निवडणुकांचा काळ तर फेक मेसेजेससाठी अत्यंत अनुकूल असतो. यावेळी सोशल साईट्सवर फेक मेसेजेस रोखण्याचा मोठा दबाव आहे. व्हॉटसअॅपने आपल्या परीने यावर एक मस्त आयडियाची कल्पना शोधून काढली आहे. 

व्हॉटसअॅपच्या नव्या फिचरमुळे बातमी खरी आहे की खोटी हे आता झटक्यात तपासता येणार आहे. चला तर बघूया हे फिचर काम कसं करतं ते !!

व्हॉटसअॅप तर्फे अधिकृतरीत्या +91-9643-000-888 हा क्रमांक देण्यात आलाय. या क्रमांकाला Checkpoint Tipline Number  म्हणतात. मेसेजचा खरेपणा तपासण्यासाठी तो मेसेज या क्रमांकावर फॉरवर्ड करायचा आहे. तुम्ही कोणताही मेसेज तपासून घेऊ शकता. अगदी एखाद्या लेखापासून ते फोटो, URL, डॉक्युमेंट फाईल असे सर्व प्रकारचे मेसेज तपासले जातील.

मंडळी, मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर तुम्हाला काहीसा असा मेसेज येईल. - “Thanks for getting in touch! Please confirm that you want to verify this item. Send 1 for 'yes', 2 for 'no'.” तुम्ही 1 क्रमांकाची निवड करा.

यानंतर तुमचा मेसेज व्हॉटसअॅपच्या तज्ञांच्या टीमकडून तपासला जातो. बातमी खरी असेल तर ‘true’ आणि खोटी असेल तर ‘false’ असा मेसेज तुम्हाला पाठवला जातो. 

मंडळी, व्हॉटसअॅपचं हे फिचर फेक मेसेजेसना रोखण्यासाठी तर आहेच, पण या फिचरने फेक मेसेज कसे पसरतात याचा अभ्यास पण करण्यात येणार आहे. 

राव, तूर्तास या फिचरवर व्हॉटसअॅपला बरंच काम करावं लागणार आहे, कारण मेसेज तपासणीचं काम अत्यंत धीम्या गतीने होत आहे. निवडणुकांपूर्वी हे फिचर सुसाट काम करेल अशी आपण आशा करूया. नाही तर ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखी गत होऊ शकते भाऊ.

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख