गेल्या काही तासंपासून इंटरनेटवर श्वेताचे मीम धुमाकूळ घालत आहेत. मीम बघून ज्यांना हे काय प्रकरण माहित त्यांना हसू आवरत नाहीये, तर ज्यांना यातले काही माहीत नाही त्यांच्या मात्र डोक्यात काहीच शिरत नाहीये. तर आता आम्ही तुम्हाला हे पूर्ण प्रकरण काय आहे हे सांगणार आहोत.
एक कॉलेज झूम कॉल सुरू होता, त्यात थोडेथोडके नाहीतर तर तब्बल १११ जण एकत्र होते. सर्व काही ठीक सुरू असताना अचानक एका श्वेता नावाच्या मुलीचा तिच्या एका मैत्रिणीसोबत फोन कॉल सुरू होतो.




