मंडळी आपल्याकडे सावित्रीने तिच्या पतीला मरणाच्या दारातून परत आणले अशा गोष्टी सांगितल्या जातात. आजही अनेक वेळा आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत घेऊन येणाऱ्या स्त्रिया आजुबाजूला पाहायला मिळतात. पण परदेशात लग्न म्हणजे एक काँट्रॅक्ट असते अशी तुमच्या मनात इमेज असेल, पण ते किती खोटं आहे हे एका आधुनिक अमेरिकन सावित्रीने सिद्ध केले आहे.
मंडळी, फ्लोरिडाचे क्ले चेस्टन आणि त्यांची बायको एकॅॅमी हनिमूनसाठी कॅरेबियन समुद्राच्या सहलीवर गेले होते. तिथल्या माऊंट लियमायगा पर्वताच्या सेंट किट्स नावाच्या शिखरावर ते फिरत असताना क्ले चेस्टन एका ५० फूट खोल ज्वालामुखीत पडले. त्या बिचाऱ्या बाईचे या घटनेने सगळे अवसान गळून पडले राव!! पण तिने हिंमत न सोडता शेवटी तिच्या नवऱ्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणले.







