घरात ९ लोक असतानाही त्याला फक्त ५ मतं मिळाली.....पण खरं काही तरी वेगळंच होतं !!

लिस्टिकल
घरात ९ लोक असतानाही त्याला फक्त ५ मतं मिळाली.....पण खरं काही तरी वेगळंच होतं !!

मंडळी, २०१९ सालच्या निवडणुकांचे निकाल काल आले. निवडणूक आहे म्हणजे जिंकणं आणि हरणं हे आलंच, पण एक उमेदवार असा होता जो हरल्यानंतर चक्क कॅमेऱ्यासमोर रडला. त्याला केवळ ५ मतं मिळाली होती. खरं दुःख हे नाहीय राव. खरं दुःख तर याचं आहे की त्याच्या कुटुंबातच ९ लोक आहेत. म्हणजे स्वतःच्या कुटुंबाने तरी त्याला मत द्यायला हवं होतं. आता अशावेळी कोण रडणार नाही? हे सांगत असताना त्याचा गळा भरून आला राव.

मंडळी, या उमेदवारचं नाव आहे नीतू शटरवाला. तो अपक्ष म्हणून पंजाबच्या जालंधर येथून निवडणुकीला उभा होता. काल निकाल हाती आल्यावर त्याला एका स्थानिक वृत्तवाहिनीने गाठलं तेव्हा हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर त्याचा फोटो, बातमी, व्हिडीओ सगळेच व्हायरल झाले होते. काहींनी तर टिकटॉक  व्हिडीओ पण केला.

मंडळी, कहाणीत एक ट्वीस्ट आहे. सगळ्यांनीच या कहाणीचा एक भाग बघितला, आम्ही दुसरा भाग सांगतो. सत्य हे आहे की नीतू शटरवाला महाशयांना ५ नाही तर तब्बल ८५६ मतं मिळाली आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीच्या वेळी ५ मतं मिळाली असं दिसून आलं होतं, पण शेवटचा आकडा हा ८५६ मतांचा होता. पण हे महाशय ५ क्रमांक बघूनच गार झाले. ‘अति घाई, पाताळात नेई’ म्हणतात ना ते असं !!

मंडळी, ८५६ मतं मिळून पण तो काही जिंकलेला नाही, पण त्याला हे तर नक्कीच समजलं असणार की घरातल्यांनी त्याला दगा दिलेला नाही

मंडळी, नीतू शटरवालाच्या डोक्यात निवडणुकीला उभं राहण्याचं भूत कुठून आलं तेही वाचून घ्या.

काही वर्षांपूर्वी नितूला एक मोबाईल सापडला, ज्याला एक खोटा बॉम्ब जोडला होता. पोलिसांनी शोधाशोध केल्यावर तो नीतूकडे सापडला आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला. मग काय, त्याला एवढा आत्मविश्वास आला की त्याने लोकसभा निवडणूक लढायचं ठरवलं.

तर मंडळी, शेवटी काय झालं ते बघतच आहात. त्याचं शटर डाऊन झालंय !!

टॅग्स:

bobhata marathimarathi bobhatabobhata infotainmentbobhata entertainmentmarathi infotainmentinfotainmentbobatabobhata marathi infotainmentinfotainment marathimarathiBobhatabobhata newsmarathi news

संबंधित लेख