मंडळी, कार चालवण्यात चॅलेजिंग काय असतं? कार पार्किंग!! गाडी व्यवस्थितपणे, मिळालेल्या तेवढ्याच जागेत पार्क करता येणं ही एक कला आहे. नवशिके बरेचदा त्यामुळं गाडी चालवणंच सोडून देतात. पॅरलल पार्किंग करताना तर वाट लागते. कधीकधी तर कसलेल्या ड्रायव्हरला पण गाडी इतक्यावेळा मागेपुढे करायला लागते की बास! भरीसभर म्हणून तुमची गाडी सेदान म्हणजे मागच्या लांबलचक डिकीची असली तर आणखी वैताग येतो, अशावेळेस छोटी कार लै बरी पडते राव. आठवते का एकदा हुंडाईने आमची गाडी कशीही फिरून लगेच पार्क करता येते अशी जाहिरात केली होती?
आज ही पार्किंगची टेक्नॉलॉजी असती तर?? इतकी भन्नाट टेक्निक आजच्या कारमध्ये का नसते??


कार पार्किंगमध्ये लावायचं एक, आणि बाहेर काढायचं दुसरं काम. तरी ते त्यातल्या त्यात जरा सोपं असतं. एकवेळ सोप्पीय राव, पण बाहेर काढण्यासाठी खास कसब लागतं. आज कार्सची संख्या वाढली आहे. जर खच्चून गाड्या भरलेल्या पार्किंगमध्ये गाडी लावणं आणि काढणं यासारखी सत्त्वपरीक्षा नाही मंडळी.
कदाचित या समस्येबद्दल एका माणसाला फार पूर्वीच समजलं होतं. त्याने कारसाठी जो शोध लावला तो आजही उपयोगाचा आहे. हा पाहा व्हिडीओ !!
मंडळी, याला म्हणतात “फिफ्थ व्हील ड्राईव्हींग”. ब्रूक्स वॉकर या संशोधकाने १९३० साली हा शोध लावला होता. त्यांनी कार पार्किंग मधून बाहेर काढण्यासाठी पाचव्या टायरची कल्पना शोधून काढली होती. हा टायर हाइड्रोलिक पंप आणि खास गियर्सद्वारे काम करायचा. कार गोल फिरून पार्किंगमधून सहज बाहेर निघायची. या टायरचा यु-टर्न घेण्यासाठी पण उपयोग व्हायचा.

हे ब्रूक्स वॉकर महाशय सॅन-फ्रान्सिस्कोच्या खाडीलगतच्या भागात राहायचे. या भागात चढावाचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर कार पार्क केली की बाहेर काढताना अडचण यायची. म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. ब्रूक्स यांनी या गरजेवर उपाय शोधून काढला. आपला शोध आणखी सुधारण्यासाठी त्यांनी त्यावर २० वर्ष काम केलं. इतिहासात त्यांचा शोध “फिफ्थ व्हील ड्राईव्हींग” नावाने प्रसिद्ध आहे. पण ब्रूक्स यांनी त्याला “पार्क कार” असं नाव दिलं होतं. हाच आहे आजच्या पार्किंग असिस्टंटचा खापर पणजोबा.

मंडळी, ब्रूक्स यांनी या पद्धतीची कार शोधली नव्हती, तर फक्त सिस्टम शोधून काढली होती. ब्रूक्स यांच्या आयडियाप्रमाणे “पार्क कार” सिस्टीम कोणत्याही कारमध्ये सहज बसवता येऊ शकत होती. त्याचा कारच्या संरचनेवर कोणताही परिणाम होणार नव्हता.
“पार्क कार” सिस्टीम कशी बसवलेली असायची हे या चित्रात पाहा.
मंडळी, ही भन्नाट गोष्ट मग आज कुठे आहे? तर ती यशस्वी झाली नाही. याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे कार बनवण्यासाठी लागणारा मोठा खर्च आणि दुसरं कारण म्हणजे ही सिस्टम लावायला सगळ्याच कारमध्ये तशी जागा नव्हती. स्वतः ब्रूक्स यांना हे अपेक्षित नव्हतं. त्यांनी आपलं संशोधन वर्षभर मोटार प्रदर्शनातून फिरवलं.
मंडळी, या संशोधनाला तसं अयशस्वी म्हणता येणार नाही कारण त्याचा जगाला उपयोगच झाला. आजचे पार्किंग असिस्टंट आणि सेल्फ पार्किंग कार्स यांची मूळ कल्पना “पार्क कार” मध्ये आहे.
तर मंडळी, कशी वाटली ही भन्नाट आयडिया. लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका !!
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलएक मुंबईत आलेला मुलगा ज्याला चेहरा बघून कोणी काम देत नव्हते तो आज स्वतः लोकांना बॉलिवूडमध्ये काम देत आहे.
२८ मे, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलखमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१