आजचा रशिया हा कधीकाळी सोवियत युनियन म्हणून ओळखला जात होता. या सोवियत युनियनचा एक फिजिक्स विषयावलतील शास्त्रज्ञ म्हणजे लिव लेंडावु!!! हे नाव विशेष परिचयाचे नाही. पण त्यांनी केलेले काम मात्र मोठे आहे. जेव्हा कधी मॅथेमॅटीकल थियरी ऑफ सुपरफ्ल्यूईडीलिटीचे नाव येते त्यावेळी त्याचे श्रेय हे लिव लेंडावु यांना जाते.
लिव लेंडावु हे थिओरिटीकल फिजिसिस्ट होते. ज्यांना खूप कमी तापमानात लिक्विड हिलीयमच्या व्यवहारांच्या शोधासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसे लिव हे लहानपणापासून असामान्य होते, वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी आपले सर्व शिक्षण पूर्ण केले होते.






